मेष
मनातील गोष्टी योग्य व्यक्ति कडेच बोला. कुटुंबातील व्यक्तीची साथ मिळेल. मानसन्मानाचे चांगले योग आहे. सगळ्या प्रकारचे लाभ मिळतील. मित्र-मंडळींचा सहवास लाभेल. मोठ्या व्यक्तींची मदत मिळेल. तब्येत सांभाळा. प्रवासाचा आनंद घ्याल. स्थावर मालमत्तेबाबत अनुकूल काळ आहे. गुंतवणुकीपासून दूर राहावे.
छायादान करावे
वृषभ
कौटुंबिक सुख आणि धनप्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला कामी येईल. प्रवासात दुखापत होऊ शकते. रिलेशनशिप्सच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा सहयोग मिळेल. वैवाहिक जीवनात सुख समाधान राहील. गुप्त शत्रू अकारण त्रास देतील.
गाईला हिरवा चारा खाऊ घाला
मिथुन
आरोग्याची छोटी मोठी तक्रार सतावू शकते. विश्वास आणि ताकद कुठेतरी कमी पडते असे वाटेल. पैशाची आवक उत्तम राहील. नातेवाईकांशी फोनवर बोलणे होईल. प्रवास घडेल. प्रेमींना उपहार मिळेल. गुंतवणुकीतून लाभाची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला टेंशन असेल. वैवाहिक जीवन उत्तम आसेल.
मजुरांना दूध दान द्या.
कर्क
व्यवसायात वाढ होईल. कामे आत्मविश्वासाने कराल. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे लागेल. काही प्रसंगात मन हळवे होऊ शकते. संघर्ष करावा लागेल. प्रवासातून आर्थिक लाभ असला तरी दुखापतीची शक्मयता आहे. प्रेम संबंधामुळे मानसिक त्रास होईल. मन धार्मिकतेकडे वळेल.
गुलाबाचे फुल आणि कापूर दान द्या
सिंह
तब्येतीची विशेष काळजी करण्याची गरज नाही. धनप्राप्तीसाठी कुटुंबीयांची मदत घ्यावी लागेल. घरातील सदस्यांबरोबर एखाद्या समारंभाला जाऊ शकता. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करत असाल तर तेथील धार्मिक स्थळाला अवश्य भेट द्या, फायदा होईल. स्थावर मालमत्तेविषयी प्रŽ असतील तर त्याची योग्य ती उत्तरे मिळतील.
संतांच्या मंदिराला भेट द्या
कन्या
तुम्ही बोलाल त्याचा वेगळाच अर्थ समोरची व्यक्ती काढू शकते. त्यामुळे बोलत असताना योग्य त्या शब्दाचाच वापर करावा. धनप्राप्ती करता अनुकूल ग्रहमान आहे. सासरच्या लोकांबरोबर महत्त्वाच्या विषयावर चर्चा करावी लागेल. प्रवासाचे उत्तम योग आहेत. लेखी कामामध्ये यश मिळेल. शेजाऱ्यांची योग्य वेळी साथ मिळेल.
लाल वस्त्र दान द्या
तूळ
जोडीदारामुळे आर्थिक लाभाची शक्मयता आहे. जे विवाह करता प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी आपण कोणतीही चूक करणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. कारण वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जाऊन लागू शकते. गुप्त शत्रूंवर मात कराल.
पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा
वृश्चिक
नको त्या गोष्टीवर खर्च करण्यापासून स्वत:ला थांबवावे लागेल. धनप्राप्तीच्या नवीन संधी प्राप्त होतील. पण तुम्ही त्याचा किती फायदा उचलता हे महत्त्वाचे ठरेल. लहान मोठ्या गुंतवणुकीतून फायदा होईल. पितृतुल्य व्यक्तीची साथ मिळेल. नोकरदार वर्गाचे कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, इतर गोष्टीकडे लक्ष दिल्या नुकसान होण्याची शक्मयता आहे.
गुळ दान द्या
धनु
आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल काळ असला तरी पैशाच्या दृष्टीने कष्टाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. कौटुंबिक वाद विवादापासून दूर राहा. नोकरदार वर्गाला अधिकारी वर्गाची योग्य ती साथ मिळेल, असे सांगता येत नाही. प्रवासातून फायद्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीविषयी कामाला थोडे पुढे ढकलावे. अचानक धनलाभाची शक्मयता आहे.
झोपताना डोक्याशेजारी पाणी ठेवून सकाळी झाडांना घालावे
मकर
आरोग्याला हरप्रकारे जपावे लागेल. कोणताही आजार अंगावर काढू नका. वैद्यकीय मदतीने आजारावर मात कराल. मानसिक त्रास संभवतो. नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल असे दिसते. प्रेम संबंधांमध्ये मधुरता येईल. नोकरदार वर्गाला थोडे कष्ट पडतील.
उजव्या मनगटावर काळा धागा बांधावा
कुंभ
हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल. असे असून सुद्धा मनात निगेटिव्हिटी येण्याची शक्मयता आहे. तब्येतीची योग्य ती काळजी घेतली नाही तर आजारांना आमंत्रण दिल्यासारखे होईल. आर्थिक बाजू चांगली असेल. मित्रांकडून हवा तसा प्रतिसाद मिळणे अवघड दिसते. मानसन्मानाची प्राप्ती होईल.
योग्य व्यक्तीला धार्मिक ग्रंथ भेट द्या
मीन
या काळात तुमचे मत जास्तीत जास्त प्रवासाकडे आकर्षित होईल. भावंडांविषयी काहीतरी करावे, असे विचार मनात येतील. प्रवास झाला तर तो पाण्याच्या ठिकाणी होण्याची शक्मयता जास्त आहे. मुलाखत- लेखन कार्य यासारख्या गोष्टींतून फायदा होऊ शकतो. इंटरनेटवर झालेली ओळख फायदेशीर ठरेल.
गरजूला तेल दान द्या
टॅरो उपाय : वयात आलेली मुले काही वेळेला चुकीचे वागतात. आजच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये चुकीचे पाऊल पडणे हे अगदी साहजिक आहे. अशा वेळेला मुलगा/ मुलगी झोपलेली असताना कावळ्याचे पीस सात वेळेला ओवाळून पत्राच्या डब्यात जाळावे. हा उपाय अनेकदा करावा लागू शकतो.