संगमेश्वर वार्ताहर
तालुक्यातील बुरंबी-तेर्ये येथील सामाजिक कार्यकर्ते शरद बाईत यांची दुचाकी जाळण्याचा गंभीर प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला. या बाबत त्यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली असून संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
तेर्ये-बुरंबी येथील शरद बाईत यांनी नेहमीप्रमाणे आपली अŸक्टिव्हा घराबाहेर जिन्याखाली पार्प केली होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञाताने ही दुचाकी घरापासून सुमारे 150 ते 200 मीटर लांब नेऊन जाळली. हा प्रकार रविवारी सकाळी निदर्शनास आला. त्यानंतर बाईत यांनी आपली अŸक्टिव्हा (क्र. एमएच 08 एक्स 5513) शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने जाळण्यात आल्याची तक्रार संगमेश्वर पोलिसात केली. यानंतर संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या गाडीचा पंचनामा केला व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गुरुवारी सायंकाळी अजून काही ठिकाणचे फुटेज मिळवण्याचा प्रयत्न संगमेश्वर पोलीस करत होते.