पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याचा आरोप; सत्र न्यायालयापुढे केले अपील
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत खून प्रकरणात पोलिसांनी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल़े, असा आरोप भाई सावंत याने केला असून सत्र न्यायालयात सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी दाद मागितली आह़े प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी भाई सावंत यांची सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची मागणी फेटाळून लावली होत़ी यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश बिले यांच्या न्यायालयात भाई सावंत, रूपेश सावंत व प्रमोद गावणांग याच्याकडून अपील दाखल करण्यात आल़े मात्र हे प्रकरण मानवी हक्कांबाबत असल्याने बिले यांच्याकडून हे प्रकरण रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक राजाराम जोशी यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आल़े या संबंधीची सुनावणी सत्र न्यायालयात घेण्यात येत आह़े भाई सावंत व अन्य तिघां संशयितांच्यावतीने ऍड. एफ़ एम़ डिंगणकर न्यायालयापुढे युक्तीवाद करत आहेत़.
31 ऑगस्ट 2022 पासून स्वप्नाली सावंत राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार भाई सावंत याने रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल केली होत़ी भाई सावंत यास पोलिसांकडून वारंवार चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात बोलावले जात होत़े पोलीस तपासात 1 सप्टेंबर रोजी मिऱया येथील घरामध्ये स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी गळा आवळून खून केला तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला व त्याची राख आणि हाडे समुद्रात फेकून दिल्याचे समोर आल़े या प्रकरणी पोलिसांनी पती सुकांत उर्फ भाई गजानन सावंत (47), रूपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (43) व प्रमोद उर्फ पम्या बाळू रावणंग (सर्व सडामिऱ्या रत्नागिरी) यांच्यावर भ़ा द़ं वि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केल़ा.
शहर पोलिसांत गुन्हा दाखल होताच 10 सप्टेंबर 2022 रोजी भाई सावंत व अन्य दोघांची शहर पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी दरम्यान आपल्याला 6 सप्टेंबरपासूनच पोलिसांनी ताब्यात ठेवले, परंतु प्रत्यक्षात अटक 10 तारखेला दाखवून 11 तारखेला न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े त्यामुळे 6 ते 10 तारखेपर्यंत पोलिसांनी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले होत़े यात मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाई सावंत यांच्यावतीने न्यायालयापुढे करण्यात आला आह़े या प्रकरणी पुढील सुनावणी 20 डिसेंबर 2022 रोजी होणार आह़े