टाळसुरे वार्ताहर
दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्राकिनारी पोहण्याचा आनंद लुटून बाहेर आलेल्या हडपसर-पुणे येथील तरुण स्वप्नील पाटील या पर्यटकाचा सोमवारी मृत्यू झाल्याची घटना घडली.
दापोली पालिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास सामित गिरमे (दत्तकृपा काॅलनी, हडपसर, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार ते व त्यांचे काही मित्र हे पुणे येथून आंजर्ले समुद्राकिनारी पर्यटनासाठी आले होते. सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास त्यांचे मित्र हे आंजर्ले समुद्राकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. काहीवेळाने सर्वजण पोहून बाहेर पडल्यावर त्यातील स्वप्नील पाटील (31, हा पोहून बाहेर आल्यानंतर त्याला अचानक उलटी होऊन चक्कर आली. त्यामुळे त्याला आंजर्लेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता दुपारी 1.30 वाजता वैद्यकीय आ†धिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा आधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल चौरे करीत आहेत.