बंदोबस्तासाठी 22 अधिकारी व 175 पोलीस कर्मचारी तैनात!
गणपतीपुळे वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे 2023 या नववर्षातील एकमेव अशा अंगारकीचा योग जुळून आल्याने या अंगारकी यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी उपस्थिती लावतील असा अंदाज स्थानिक व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे . या अंगारकी यात्रा उत्सवासाठी घाटमाथ्यावरील कोल्हापूर सांगली सातारा कराड इस्लामपूर कवठेमहाकाळ मिरज आदी ठिकाणाहून लाखो भाविक स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी येत असतात यातील घाटमाथ्यावरील काही निवडक गणेश मंडळाकडून येणाऱ्या भाविकांसाठी खिचडी प्रसाद व महाप्रसादाचे वाटप देखील केले जाते.
यंदा 2023 या वर्षातील एकमेव अंगारकीचा योग असल्याने घाट माथ्यावरील भाविक व गणेश मंडळे मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावण्याचा अंदाज वर्तवला जात आहे एकूणच या अंगारकी यात्रोत्सवासाठी स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे ३.३०वाजता दर्शनासाठी खुले होणार असून प्रारंभी मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर व त्यांचे सहकारी यांची वतीने पूजाअर्चा व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी मंदिर परिसरात दर्शना रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच दर्शन रांगेच्या ठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व दर्शन रांगा व मंदिर परिसर, समुद्र चौपाटी परिसर आदी परिसरात विद्युत व्यवस्था गणपतीपुळे देवस्थान समिती व ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे एकूणच अंगारकी यात्रोत्सवासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती ग्रामपंचायत गणपतीपुळे व जयगड पोलीस ठाणे आदी यंत्रणा सज्ज झाल्या असून या अंगारकी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत एकूण 22 पोलीस अधिकारी व 175 पोलीस कर्मचारी तसेच 30 राखीव पोलीस दलाचे कर्मचारी बंदोबस्तासाठी संपूर्ण गणपतीपुळे परिसरात तैनात ठेवण्यात येणार आहेत यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा संशयास्पद हालचाली दिसून दिसून येऊ नये याकरिता विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे एकूणच अंगारकीच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे तीर्थक्षेत्र सज्ज झाले असून लाखो भाविकांच्या स्वागतासाठी स्थानिक व्यावसायिक तयारीत राहिले आहेत.