नवी दिल्ली
आयटीक्षेत्रातील कंपनी कॉग्निझंटने मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) रवि कुमार यांची तातडीने नियुक्ती केली असल्याची माहिती आहे. रविकुमार यांनी यापूर्वी इन्फोसिसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. 15 मार्चपासून ब्रायन हम्फायर हे पद सोडत असून त्यांची जागा रवि कुमार घेतील. या आधी नव्या सीईओवर चर्चा केली जात होती. त्यात रविकुमार यांचेच नाव पुढे होते.