वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या खेळाडूंसाठी नवी जर्सी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रविवारी येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीतर्फे जर्सी अनावरण समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला.
या समारंभाला आरसीबीचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या समारंभाला ‘आरसीबी अनबॉक्स’ असे नाव देण्यात आले होते. कर्णधार विराट कोहली, डू प्लेसीस, ख्रिस गेल, एबी डिव्हिलीयर्स यांनीही आपली उपस्थिती दर्शविली होती. या कार्यक्रमानंतर आरसीबीने काही वेळासाठी सराव सत्र आयोजित केले होते. आरसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये ख्रिस गेल आणि डिव्हिलीयर्स यांचा समावेश करण्यात आला. यावेळी त्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. नंतर गायक सोनू निगम व जेसन देऊला यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. 2023 च्या आयपीएल स्पर्धेत आरसीबीचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स बरोबर 2 एप्रिलला बेंगळूरमध्ये होणार आहे.