राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी आज अचानक वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. य़ा भेटीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या गोष्टीला दुजोरा दिला असून बंडखोर आमदारांनी शरद पवारांची दिलगीरी व्यक्त करण्यासाठी भेट घेतली गेल्याचे त्यांनी सांगितले.
वाय़बी चव्हाण सेंटरच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच येणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर चर्चेतून मार्ग काढण्याची विनंतीही त्यांनी पवारसाहेबांना केली आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “या आमदारांतर्फे प्रप्फुल्ल पटेल आणि झिरवळ यांनी प्रत्यक्ष पवारसाहेबांशी चर्चा केली. दिलगीरी व्यक्त करताना चर्चेतून मार्ग काढण्याची विनंती केली. तसेच पक्ष एकत्र ठेवण्यासाठी काही ना काही मार्ग काढावा अशी विनंतीही त्यांनी केली. यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
येत्या पावसाळी विधीमंडळ अधिवेशनात विरोधीपक्षनेते पदाच्या नियुक्तीवर भाष्य करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणले, “आम्हाला 19 ते 20 आमदारांचा पाठींबा आहे. आमदारांनी बंडखोरी जरी केली असली तरी कागदावर आमचेच बळ अधिक आहे. तरीही विरोधी पक्षनेते पदासाठी मी महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षाशी चर्चा केली आहे. सध्या कॉंग्रेसचे ज्यादा संख्य़ाबळ दिसत आहे. त्यामुळे ती काँग्रेसला जाईल.” असे ते म्हणाले.