भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि त्यांच्या कंत्राटदारांनी विक्रमी ५ दिवसांत ७५ किलोमीटर लांबीचा बिटुमिनस काँक्रीट रस्ता तयार केला आहे. याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्राधिकरणाच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. जे या महिन्याच्या ३ तारखेपासून सुरू झालेल्या डांबरीकरणाच्या कामासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये प्राधिकरण, कंत्राटदार, अभियंते आणि मजूर यांच्या पथकाचा समावेश आहे.
अमरावती आणि अकोला दरम्यान NH-५३ येथे एकाच मार्गिकेमध्ये हे काम करण्यात आलं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला.