15 हजार कोटींची भर ः बाजार घसरणीत तरीही गुंतवणूक कायम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इक्विटी फंडातील गुंतवणूक ही नऊ महिन्यांच्या विक्रमी स्तरावर पोहोचली असल्याची माहिती आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये 15 हजार 886 कोटी रुपये इतके गुंतविले गेले आहेत. जानेवारीपासून 25 टक्के इतका शेअरबाजार कोसळूनसुद्धा मागच्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे.
बाजार घसरणीत तरीही
गेल्या वषी मे महिन्यामध्ये इक्विटी फंडामध्ये 18 हजार 529 कोटी रुपये गुंतवणूक झाली होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया यांच्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये सलग तिसऱया महिन्यामध्ये इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक वाढली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये इक्विटी फंडात 2 हजार 258 कोटी रुपये गुंतवणूक झाली होती. मागच्या महिन्यामध्ये सेन्सेक्समध्ये 1.25 टक्के आणि निफ्टीमध्ये 1.77 टक्के घसरण झाली होती. या महिन्यातसुद्धा शेअरबाजारामध्ये चढउतार दिसून आला आहे.
गुंतवणुकीचा ओघ सुरुच
गेल्या दोन दिवसांमध्ये सेन्सेक्स निर्देशांकामध्ये 1200 अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे. असे असतानाही 24 महिन्यांपासून इक्विटी फंडामध्ये शुद्ध स्वरुपामध्ये गुंतवणूक सुरूच राहिली आहे, हे विशेष म्हणावे लागेल. शेअरबाजारात घसरण असताना नऊ महिन्यांनंतर सर्वाधिक गुंतवणूक फेब्रुवारीमध्ये झाली आहे.