फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्सची माहिती
नवी दिल्ली
गेल्या वर्षी देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राने चांगली कामगिरी केली. विशेषतः गाडय़ांची विक्री 34.31 लाखांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याची माहिती आहे, मात्र डिसेंबर महिन्यात किरकोळ वाहनांच्या एकूण विक्रीत 5.40 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (फाडा)आपल्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे.
फाडाचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले, ‘ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सणासुदीच्या काळात वाहनांची चांगली विक्री झाल्यानंतर, डिसेंबर महिन्यात थोडी घसरण झाली आहे. दुचाकींच्या विक्रीतही घट झाली आहे. गेल्या महिन्यात वाहनांच्या एकूण विक्रीवर परिणाम झाला असल्याचेही ते म्हणाले आहेत’.
2022 मधील वाहन विक्रीची स्थिती ः
w वाहनांची किरकोळ विक्री 15.28 टक्के वधारली
w वाहनांची विक्री 15.28 टक्क्यांनी वधारुन 2,11,20,441 झाली
w कार विक्री 34,31,497 च्या घरात पोहोचली
w दुचाकी विक्री 13.37 टक्क्यांनी वाढून 1,53,88,062 झाली
w डिसेंबर 2022 मध्ये विक्रीत 5.40 टक्क्यांनी घट
w डिसेंबर 2022 मध्ये एकूण 16,22317 वाहनांची विक्री
w 2,80,016 कार्सची विक्री