वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोमवारी गोव्यात झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये बंगाल क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष अविशेक दालमिया तसेच आयपीएलचे विद्यमान चेअरमन अरुणसिंग धुमल यांची आयपीएल नियंत्रण मंडळामध्ये फेरनिवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये सर्वसाधारण मंडळाने वार्षिक मिळकतीमध्ये 38 टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाल्याबद्दल बीसीसीआयचे खास अभिनंदन करण्यात आले आहे. आगामी द्विपक्षीय क्रिकेट मालिकांमध्ये होणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी प्रसार माध्यम हक्कांसाठी 67 कोटी रुपयांची मिळकत झाली आहे. या बैठकीमध्ये गेल्या आर्थिक वर्षातील झालेल्या नफ्याबद्दल तसेच बीसीआयच्या नव्या बजेटचे सर्व सदस्यांनी कौतुक केले आहे.