पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने (सीईटी सेल) विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याचे सांगितले आहे.
या मुदतीनंतर नोंदणी आणि पडताळणी केलेल्या विद्यार्थ्यांचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. पसंतीक्रम भरणे व पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक काही दिवसांत प्रसिद्ध केले जाणार असल्याचे सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची निश्चिती करण्याची प्रक्रिया 8 जुलै रोजी संपणार आहे. सात जुलैनंतर नोंदणी व पडताळणी झालेल्या अर्जांचा विचार नॉन कॅप जागांसाठी केला जाईल.
नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ : www.mba2023.mahacet.org.in