10 एमबीपीएस ते 100 एमबीपीएस स्पीडचा पर्याय
प्रतिनिधी/ नवी दिल्ली
आयपीएल 2023 दोन दिवसांनी म्हणजे 31 मार्चपासून सुरू होणार आहे. अशाप्रकारे, टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या फायबर ब्रॉडबँड ग्राहकांसाठी एक नवीन स्वस्त योजना सादर केली आहे. कंपनीने या योजनेअंतर्गत फायबर ब्रॉडबँड इंटरनेट जोडणी फक्त 198 रुपयांच्या मासिक किमतीत देणार असल्याची घोषणा केली आहे.
कंपनीने हा प्लान ‘जिओ फायबर बॅकअप प्लॅन’ या नावाने सादर केला आहे. यामध्ये यूजरला अनलिमिटेड इंटरनेट मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहक 10 एमबीपीएस ते 100 एमबीपीएस असा स्पीडचा पर्याय निवडू शकतात. नवीन प्लॅन करीता ग्राहकांना 30 मार्चपासून रिचार्ज करण्याची सुविधा कंपनी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे. या योजनेचा फटका इतर स्पर्धकांना बसणार आहे.
एक क्लिक स्पीड अपग्रेड सुविधाही उपलब्ध
जिओ फायबर ब्रॉडबँड बॅक-अप प्लॅनमध्ये अमर्यादित लँडलाइन
कॉलिंग देखील उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये एक क्लिक स्पीड अपग्रेड सुविधा देखील उपलब्ध असेल. म्हणजेच, तुम्ही 1/2/7 दिवसांसाठी एका-क्लिकने स्पीड अपग्रेड करू शकता.