महापालिकेची कारवाई : नागरिकांतून समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
किल्ला तलावा समोरील स्मार्ट बस थांब्या शेजारी मोडकळीस आलेल्या धोकादायक बस थांब्याचे शेड हटवण्याची कारवाई महापालिकेने केली आहे. याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शेजारी असलेल्या स्मार्ट बस थांब्यातील आसन व्यवस्था मोडकळीस आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
पत्रामध्ये बनविण्यात आलेले बस थांबा शेडचे छत मोडकळीस आले होते. प्रवाशांच्या अंगावर पडण्याचा धोका होता. त्यामुळे तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
त्याची दखल घेत महापालिकेने सदर धोकादायक बस थांब्याचे शेड पूर्णपणे हटविले.