जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे ग्रामस्थांची मागणी
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील हरगापूर ग्रामस्थांकडून गावाचे नाव वल्लभगड करण्यासाठी अनेकवेळा ग्राम पंचायतीमध्ये ठरावपास करण्यात आला आहे. याबरोबरच प्रशासनालाही निवेदन देण्यात आले आहे. मात्र गावचे नाव बदलण्यात आलेले नाही. हरगापूर बदलून वल्लभगड असे गावाला नाव देण्यात यावे, अशी मागणी करत ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हरगापूर गावचे नाव कागदोपत्री हरगापूरगड असे आहे. परंपरागत गावचे नाव वल्लभगड असे आहे. ग्रामस्थांकडून गावाचा वल्लभगड असाच नामउल्लेख केला जातो. गावचे नाव हरगापूर वगळून वल्लभगड असे करण्यात यावे. यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्राम पंचायतीमध्ये अनेकवेळा ठरावपास करून तहसीलदार व मंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. असे असले तरी गावचे नाव बदलण्यात आलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेवून गावाला हरगापूरगड असे असणारे नाव बदलून वल्लभगड असे नामांतर करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे सादर केली आहे. यावेळी पवन पाटील, आनंद शेंडे, रविंद्र शेलार, प्रकाश मगदूम, सुधाकर माने, विजय शेलार आदी उपस्थित होते.