वार्ताहर /जांबोटी
रामपूरपेठ जांबोटी येथील श्री राम युवा योद्धा यांच्यावतीने सामाजिक बांधीलकी जोपासून बसस्टँड ते जांबोटी ग्राम पंचायत या रस्त्याचे गेल्या पाच वर्षापूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आले होते. परंतू निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता खराब झाला. रस्त्यावर खूप मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे लहान-मोठय़ा वाहनांना ये-जा करणे अवघड झाले होते. याबाबत ग्रामस्थांनी पंचायतीकडे हा रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात अर्ज विनंत्या केल्या होत्या. केवळ आश्वासने देण्यात येत होती. मात्र रस्ता दुरुस्ती केला गेला नाही. त्यांच्या आश्वासनाला कंटाळून गावातील श्रीराम युवा योद्धा व गावातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला व गणेश चतुर्थीच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे खड्डे मुरूम व माती टाकून बुजवण्यात आले. व रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे. या रस्त्यावर कृषी खात्याचे कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जांबोटी सोसायटी, वनखात्याचे कार्यालय आहे.
यावेळी गावातील वरि÷ रमाकांत गोवेकर, सुरेश पारवडकर आणि युवा कार्यकर्ते राजू कुरलेकर, मिथुन कुंभार, सचिन कुडतुरकर, मदन कुडतुरकर, सुशांत डांगे, प्रज्योत हळदणकर, सुशांत पारवडकर, रोहन पारवडकर, विवेक वेताळ, सुमित पाटील, आनंद सुतार, सुरेश नाईक, पप्पू हळदणकर, शंतनु जांबोटकर, संस्कार कणगुटकर, पंढरी नाईक यांनी परिश्रम घेऊन सामाजिक कार्य केले. तसेच खड्डे बुजवण्यासाठी लागणारे मुरूम, दगड वाहतूक करण्यासाठी प्रमोद कोलेकर यांनी मोफत ट्रक्टर उपलब्ध करून सहकार्य केले.