प्रतिनिधी/ पणजी
सत्तरी, धारबांदोडा, पेडणे आणि सांगे तालुक्मयांमध्ये पसरलेल्या अल्वारा जमिनींसंबंधीच्या जमिनीच्या नोंदींचा अभ्यास पूर्ण झाला आहे. माजी नोकरशहा एन. डी. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे.
एन. डी. अग्रवाल समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे या जमिनींच्या मालकीचे वाटप करण्याबाबत सरकार पुढील पावले उचलण्याची शक्मयता आहे. एन डी अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची स्थापना करण्यात आली होती. ज्यात सत्तरी, धारबांदोडा, पेडणे आणि सांगे तालुक्मयांमध्ये पसरलेल्या अल्वारा जमीन प्रकरणाची तपासणी करण्यात आली होती. यात अधिकारांच्या नोंदींचे अद्ययावतीकरण आणि अल्वाराच्या होल्डिंग्सच्या अधिकारांच्या नोंदींची अद्ययावत यादी देण्यात आली होती.