टोकदार हातोडा अन् भाल्यासारखे टोक असणारे अस्त्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीन पुन्हा एकदा गलवान येथील झटापटीत वापरण्यात आलेली धारदार आणि टोकदार अस्त्रांची खरेदी करत आहे. चिनी सोशल मीडिया ऍप वीबोवर अशाच एका अस्त्राचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. या छायाचित्रात एक सैनिक टोकदार अस्त्र हातात धरून असल्याचे दिसून येते.
या अस्त्राला ‘कंबाइंड मेस’ म्हटले जाते. हे ’कोल्ड वेपन’ शेणीतील अस्त्र आहे. याच शेणीच्या अस्त्रांचा वापर चिनी सैनिकांनी 14-15 जून 2020 दरम्यान गलवान खोऱयात झालेल्या झटापटीदरम्यान केला होता. ‘कंबाइंड मेस’ हे धातूने तयार केलेले अस्त्र आहे. हे एखाद्या रॉडप्रमाणे दिसते आणि याची लांबी 1.8 मीटर इतकी असते. रॉडच्या एका बाजूला हातोडय़ासारखी रचना असते. तसेच याला काटय़ासारखे भाग जोडलेले असतात तर दुसरी बाजूही टोकदार असते.
हँड-कॉम्बॅट वेपन्सची खरेदी
चीन एकीकडे भारतासोबतच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय आणि जी20 द्वारे भारतासोबत राजनयिक संबंध सुधारत आहे. तर दुसरीकडे हँड-कॉम्बॅट वेपन्सची खरेदी करत आहे. चीन या अस्त्रांचा वापर पुन्हा भारतीय सैनिकांच्या विरोधात करू शकतो असे तज्ञांचे मानणे आहे. गलवानसारखाच हल्ला चीन पुन्हा घडवून आणू शकतो. गलवान येथील झटापटीत भारताच्या 20 सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.
चीनकडून 2600 मेसची खरेदी
चीनने सुमारे 2600 ‘कंबाइंड मेस’ खरेदी करण्यात आली आहे. चीनने जानेवारी महिन्यात मेस आणि कंबाइंड मेस खरेदी करण्याची ऑर्डर दिली होती. फेब्रुवारीमध्ये ही अस्त्रs खरेदी करण्यात आली होती. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तियानजिन शहरात गुन्हेगारांना पकडण्यासाठी अशाप्रकारच्या अस्त्रांचा वापर केला होता.
चीनचे 38 सैनिक झाले होते ठार
15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱयात दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत चीनचे 38 सैनिक मारले गेले होते. परंतु चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने 4 सैनिक मारले गेल्याची बाब मान्य केली होती.