वार्ताहर /काकती
येथील मार्कंडेय नदीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱया वृद्ध महिलेचा जीव तात्काळ प्रसंगावधान राखून मच्छीमाराने जीव वाचविला आहे.
येथील मार्कंडेय नदीत सकनाथ बंधाऱयाजवळ बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास 65 वषीय महिलेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथे जवळच मासे पकडणाऱया आकाश दुर्वे या माच्छीमाराने वृद्ध महिला नदीत उडी टाकून वाहत जात असल्याचे पाहताक्षणीच नदीत पोहत जाऊन महिलेला काठावर आणून जीव वाचविले. येथील समाजसेवक ग्राम पंचायत सदस्य गजानन गवाणे, विनायक केसरकर यांना तात्काळ आकाश दुर्वेने फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर वृद्ध महिलेला 108 रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. सदर महिलेला नाव विचारले असता ती काहीच बोलत नव्हती. काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.