वृत्तसंस्था/ लाहोर
पाकचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिजकडे यापुर्वी पीसीबीने क्रिकेट तांत्रिक समिती सदस्यपद सोपवण्यात आले होते पण भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मोहम्मद हाफिजने आपल्या या पदाचा त्याग केला आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाक संघाच्या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी घेत हाफिजने आपले हे पद स्वखुशीने सोडले आहे.
शुक्रवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकचा 15 जणांचा संघ जाहीर करण्यात आला. या स्पर्धेसाठी संघ निवडताना पीसीबीच्या निवड समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये दोन बदल करण्यात आले. जखमी नसीम शहा आणि अष्टपैलू फईम अश्रफ यांना वगळण्याचा निर्णय निवड समिती प्रमुख इंझमामने घेतला. पाक क्रिकेटच्या तांत्रिक समितीचे मानद सदस्यत्व आपल्याला झेका अश्रफ यांच्यामुळे मिळाले होते. आपल्याला हे पद बहाल करून पाक क्रिकेटची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल हाफिजने झाका अश्रफ यांचे आभार मानले आहे तसेच आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाक संघाला हाफिजने शुभेच्छा दिल्या आहेत. पीसीबीच्या निवड समिती बैठकीला संघाचे क्रिकेट संचालक निकी आर्थर तसेच गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, उपकर्णधार शदाब खान उपस्थित होते.