नवी दिल्ली
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे दक्षिण आशिया व भारतीय धोरण प्रमुख समीरण गुप्ता यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ट्वीटर (एक्स)या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या सोशल मीडिया कंपनीत ते धोरणसंबंधी विभागाचे काम पाहात होते. मजकूरसंबंधीत धोरणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. राजीनाम्यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. कंपनीसाठी नव्या धोरणासंबंधीत सुधारणा करण्यामध्ये त्यांचा वाटा अधिक होता.