मुंबई
जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ सोमवारी बाजारात खुला झाला असून मंगळवारी दुसऱ्या दिवशी हा आयपीओ 1.11 पट सबस्क्राइब झाल्याचे पहायला मिळाले. सोमवारी 25 सप्टेंबरला खुला झालेला आयपीओ बुधवार 27 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी आयपीओ सबस्क्राइब करण्यासाठी चांगला प्रतिसाद नोंदवला होता. आयपीओअंतर्गत 15,08,31,198 समभागांकरीता गुंतवणूकदारांनी बोली लावली होती.