समभाग 12 ऑक्टोबरला सूचिबद्ध होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिटेल गुंतवणूकदारांचा दबाव असताना प्लाझा वायर्सचा आयपीओ खुला झाल्यानंतर 80 मिनिटातच पूर्णपणे सबक्राईब झाला आहे. शुक्रवारी हा आयपीओ सबक्रीप्शनसाठी खुला झाला होता. सदरचा कंपनीचा समभाग हा 12 ऑक्टोबर रोजी बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.
प्लाझा वायर्सचा आयपीओ खुला झाल्यानंतर सकाळी 11 वाजून वीस मिनिटांनी 100 टक्के सबक्राईब झाला होता. आयपीओला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. आयपीओ अंतर्गत 71.2 कोटी रुपयांचे 1.32 कोटी ताजे इक्विटी समभाग सादर करण्यात आले होते. अद्याप संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून बोली लावण्यासाठी प्रतिसाद मत्रा लाभलेला दिसला नाही.
समभागाची किंमत
आयपीओअंतर्गत कंपनीने आपल्या समभागाची किंमत 51-54 रुपये ठेवली आहे. एका लॉटमध्ये 277 समभाग असणार असून याकरीता गुंतवणूकदारांना बोली लावता येईल. आयपीओतील 75 टक्के हिस्सा पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी तर 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी असेल.
काय करते कंपनी
प्लाझा वायर्स ही प्लाझा केबल्सअंतर्गत तारांची निर्मिती व विक्री तसेच एलटी अॅल्युमिनीयम केबल तसेच वेगाने विकल्या जाणाऱ्या विजेच्या साहित्याची विक्री व विपणनाचा व्यवसाय करते.