सलग ४ वर्षे १००% निकालाची परंपरा कायम
रामचंद्र गावडे ९४.८० टक्के मिळवून प्रथम
चौके/वार्ताहर
मालवण तालुक्यातील चौके पंचक्रौशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित भ.ता.चव्हाण,म.मा.विद्यालय चौके या प्रशालेचा दहावी माध्यमिक परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००% लागला आहे. या परिक्षेसाठी प्रशालेतून ४२ विद्यार्थी बसले झाले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल सलग ४ थ्या वर्षी १००% लागला. यामध्ये अनुक्रमे रामचंद्र शिवराम गावडे ९४.८० मिळवून प्रथम क्रमांक,अंजली अनिल शिरतोडे ९०.२० द्वितीय तर ९२.२०%, रिना भानजी गावडे ८९.२० हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. ४२ विद्यार्थ्यांनपैकी २२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तर १४ विद्यार्थी प्रथम श्रेणी ने उत्तीर्ण झाले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुंबई संस्था अध्यक्ष जगदिश परब व कार्यकारी मंडळ आणि स्थानिक संस्था अध्यक्ष बिजेंद्र गावडे व कार्यकारी मंडळ चौके, तसेच माजी मुख्याध्यापक विजय गावकर सर,राजन खोचरे सर नुतन मुख्याध्यापिका गोसावी मँडम ,सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे.