दहावीचा सरासरी निकाल 92.75 टक्के : फेरतपासणी, पुनर्मुल्यांकन 3 जूनपासून,शाळांना गुणपत्रिका वितरण 4 जूनपासून
प्रतिनिधी /पणजी
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) वर्ष 2021-22 मध्य़े घेतलेल्या दहावी अर्थात एसएससी परीक्षेचा निकाल 92.75 टक्के एवढा लागला आहे. बारावी परीक्षेच्या निकालाप्रमाणे दहावी परीक्षेत देखील मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 116 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून त्यात 35 सरकारी हायस्कूल, 74 अनुदानीत व 7 विना अनुदानीत शाळांचा समावेश आहे.
गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेटय़े यांनी पर्वरी येथील शिक्षण संचालनालयातील परिषद सभगृहात हा निकाल जाहीर केला. दहावी परीक्षेला एकूण 20345 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 18869 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींचा निकाल 93.91 टक्के तर मुलांचा निकाल 91.62 टक्के एवढा लागला असून एकूण सरासरी निकाल 92.75 टक्के लागला आहे.
यंदा परीक्षेत एकही गैरप्रकार नाहाr
एकूण 31 परीक्षा केंदे आणि 173 उपकेंद्रातून दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 10359 मुलांनी तर 9986 मुलींनी परीक्षा दिली होती. त्यातील अनुक्रमे 9491 मुले तर 9378 मुली परीक्षेत उतीर्ण झाल्या. 51 मुलांचा व 48 मुलींचा मिळून 99 जणांचा निकाल विविध कारणामुळे राखून ठेवण्यात आला असून यंदाच्या दहावी परीक्षेत एकही गैरप्रकार झाला नसल्याचा दावा शेटय़े यांनी केला आहे.
यंदाचा निकाल पुन्हा सरासरीच
मागील वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे शाळेतील अंतर्गत मूल्यमापनावर निकाल देण्यात आला होता आणि तो आजपर्यंत सर्वोत्तम म्हणजे 99.72 टक्के एवढा होता. त्यावेळी जवळपास सर्वच मुले उत्तीर्ण झाली होती. परंतु यावर्षी हाच निकाल खाली येऊन पुन्हा दरवर्षीच्या सरासरी इतकाच म्हणजे 92.75 टक्के झाला आहे. 2017 – 91.57, 2018- 91.27, 2019- 92.47, 2020- 92.69 अशी निकालाची सरासरी टक्केवारी होती.
916 विद्यार्थ्यांना मिळाले क्रीडागुण
यंदाच्या निकालात 916 मुलांना क्रीडा गुणांचा लाभ झाला तथापी 17 जणांनाच त्याचा फ्ढायदा मिळून ते उत्तीर्ण झाले. एकूण 116 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून त्यात 35 सरकारी हायस्कूल, 74 अनुदानीत व 7 विना अनुदानीत शाळांचा समावेश आहे.
यंदा दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली होती आणि दोन्ही सत्रांचा मिळून सरासरी एकच निकाल देण्यात आला आहे. दोन सत्र परीक्षा यापुढे देखील चालूच राहणार असल्याचे शेटय़े यांनी स्पष्ट केले. दोन्ही सत्र परीक्षांची मिळून एकच गुणपत्रिका देण्यात येणार असल्याचे शेटय़े म्हणाले.
जुलैमध्ये होणार पुरवणी परीक्षा
साधारणपणे 3 ते 4 आठवडय़ांनी म्हणजे जुलैच्या पहिल्या सप्ताहात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असून त्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकांची फ्sढरतपासणी पुनर्मुल्यांकन यासाठी दि. 3 जून रोजी बोर्डाचे पोर्टल खुले करण्यात येणार असून अनुक्रमे 10 व 15 जून अशी अंतिम मुदत त्यासाठी देण्यात आली आहे. त्यासाठी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून योग्य ते शुल्क भरावे असे शेटय़े यांनी सुचित केले आहे.
गुणपत्रिकांचे वितरण 4 जूनपासून
दहावी निकालाच्या गुणपत्रिका शाळांना 4 जूनपासून वितरीत करण्यात येणार असून त्यांनी अधिकृत पत्रासह प्रतिनिधी पाठवण्याची सूचना बोर्डाने केली आहे.
बार्देश, पेडणे तालुका शाळांचा निकाल ज्ञानप्रसारक विद्यालय म्हापसा येथे सकाळी 9 वाजल्यापासून देण्यात येणार आहे. डिचोली, सत्तरी तालुक्यातील शाळांचा निकाल शांतादुर्गा हायस्कूल डिचोली येथे सकाळी 9 वाजल्यानंतर मिळणार आहे. काणकोण, केपे, मुरगाव, सालसेत, सांगे या पाच तालुक्यातील शाळांचा निकाल लॉएला हायस्कूल मडगाव येथे सकाळी 9 वाजल्यापासून दिला जाणार आहे. फ्ढाsंडा, धारबांदोडा तालुक्यातील शाळांना त्यांचा निकाल जीव्हीएम हायरसेकंडरी स्कूल फ्ढाsंडा येथे सकाळी 9 वाजल्यापासून मिळणार आहे. तिसवाडी तालुका व पर्वरी भागातील शाळांना त्यांचा निकाल बोर्ड कार्यालयातून सकाळी 9 वाजल्यापासून दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.