Retired teacher Indira Bhagwat passed away
मुंबई ऐक्यवर्धक संघ संचलित मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका इंदिरा गजानन भागवत (८३) यांचे शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री गोवा येथे निधन झाले. मळगांव हायस्कूलमध्ये हिंदी विषयाच्या शिक्षीका म्हणून त्यांनी अध्यापन करताना त्या स्काऊट गाईड विषयही शिकवायच्या. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणुन त्यांची ओळख होती. मळगांव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य गजानन भागवत यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ओटवणे / प्रतिनिधी