प्रतिनिधी/बेळगाव: बेळगाव महापालिकेच्या महसूल खात्याच्या उपायुक्तांनी घेतलेल्या बैठकीत मानसिक ताण येऊन एका अधिकाऱ्याला उभ्या उभ्या भोवळ आल्याची घटना आज सकाळी घडली.
महानगर पालिकेत आज बेळगाव उपायुक्त (महसूल) रेश्मा ताळीकोटी यांच्या अध्यक्षतेखाली शहरात जमा झालेला महसूल, सद्य परिस्थिती आणि लक्ष्य तसेच महसूल गोळा करण्यामध्ये येत असलेली समस्या यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी महसूल अधिकारी श्रीकांत इराले यांना काही विषय संदर्भात धारेवर धरले असता अधिकारी श्रीकांत यांनी उपायुक्तांच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना भोवळ येऊन कोसळले.
अचानकच त्यांनी प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी इस्पितळात हलविण्यात आले अशी माहिती मिळाली आहे.