‘टायगर 3’ अन् ‘जवान’ चित्रपटात साकारणार भूमिका अभिनेत्री
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रिद्धि डोगरा लवकरच ‘लगडबग्घा’ चित्रपटाद्वारे स्वतःचे बॉलिवूड पदार्पण करणार आहे. पदार्पणातील चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच रिद्धिला सलमान खान आणि शाहरुख खानच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. बहुप्रतीक्षित चित्रपटात काम करण्याची संधी फारच कमी कलाकारांना मिळत असते. या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या चित्रपटात ती भूमिका साकारणार आहे. एटली कुमारचा चित्रपट ‘जवान’ 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानसह या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपति हे कलाकार दिसून येतील. चित्रपटात रिद्धि डोगराची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मी काम करत आहे. या चित्रपटात रिद्धिही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येईल. रिद्धिने सोशल मीडियावर पोस्ट करत स्वतःच्या पदार्पणातील चित्रपट ‘लकडबग्घा’ची घोषणा केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान झा, परेश पहुजा आणि मिलिंद सोमण हे कलाकार आहेत.