मालवण / प्रतिनिधी
सरकार पक्षातर्फे ॲड. तुषार भणगे यांनी पाहिले काम
फौजदारी बलप्रयोग केल्याप्रकरणी मालवण येथील मे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एम . आर. देवकाते यांनी दोन आरोपींना एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर केसचे काम सरकार पक्षातर्फे ॲड तुषार भणगे यांनी काम पाहिले.दिनांक १७/१२/२०२१ रोजी फिर्यादी महिला तिच्या कुटुंबीयासोबत घरी येत असताना रात्री ११ च्या दरम्यान आचऱ्याच्या दिशेने येत असताना वाटेत एक डंपर त्यांचे वाहन पुढे जाऊ देत नव्हता. जेव्हा त्यांनी याबाबत डंपर चालकास विचारणा केली तेव्हा त्याने इतर आरोपींना घटनास्थळी बोलावून फिर्यादी व तिच्या कुटुंबीयास मनात लज्जा उत्पन्न होईल अशी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली अशी फिर्याद आचरा पोलीस स्थानक येथे दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी देण्यात आली होती. सदर फिर्यादी नुसार आरोपी स्वप्निल भीमसेन वराडकर व निखिल भीमसेन वराडकर यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर केसचे काम सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. सदर केस मध्ये आरोपी स्वप्निल भीमसेन वराडकर व निखिल भीमसेन वराडकर यांनी फौजदारी बळाचा वापर केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली .