वास्को : चिखली वास्कोतील शिवस्मारकांच्या मागील बाजुने असलेल्या डोंगराच्या कडा कोसळण्याचा धोका संभवत आहे. मोठमोठ्या दरडी या डोंगराच्या कडेवरून सरळ रस्त्यावर कोसळून दुर्घटना घडण्यापूर्वीच या समस्येची दखल घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. चिखलीच्या नाक्यावरून वास्को शहराच्या दिशेने येताना डाव्या बाजुला शिवस्मारक आहे. या स्मारकाच्या मागील बाजुला असलेला डोंगराच्या कडेचा भाग मातीची धुप आणि अधिक उष्णतेमुळे झाडे करपून उघडा बोडका झालेला असून डोंगराच्याकडेवर असलेल्या दरडी माती व झाडांच्या आधारावीना असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. पावसाळ्यात या दरडी रस्त्यावर कोसळण्याचा धोका आहे. या डोंगराच्या कडेखाली मुख्य रस्ता असल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे मोठी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते. पावसाळ्यापूर्वीच या धोक्याची पाहणी करून खबरदारीची उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Previous Articleगोवा सुपर बॉडीज संघटनेच्या अध्यक्षपदी शांबा गावस
Next Article मडगावात गुरुवारपासून सरस महोत्सव
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.