पातळी ओलांडली आहे. भारतीय हवामान खात्याने सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्यानंतर पडलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूरवर पुन्हा एकदा महापूराचे सावट ओढावले आहे. प्रशासनाने संभाव्य महापूराच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला असून स्थलांतराचे काम सुरु केले आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडीचे गेल्या काही तासांचा तपशील पुढील प्रमाणे
•जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
•पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली, धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरु आहे.
•राधानगरी पाणलोट क्षेत्र तसेच धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरण 89%, तर काळम्मावाडी धरण 47% भरले आहे.
•राधानगरी धरणक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
•करवीर तालुक्यातील चिखली ग्रामस्थ्यांचे स्थलांतर सुरु, शहरात महापालिकेकडून गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
• आत्तापर्यंत आलेल्या माहीतीनुसार जिल्ह्यातील 20 कुटुंबांचे आणि 15 जनावरांचे स्थलांतर सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
• मुसळदार पडणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 27 घरांचे नुकसान झाले आहे.
• कोल्हापूरला जोडणारे मार्ग जसे कोल्हापूर- गगनबावडा, चंदगड- बेळगाव, राधानगरी-निपाणी यासह 14 मार्ग बंद करण्यात आले आहेत.
• जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग, 20 प्रमुख जिल्हा मार्गासह 30 इतर मार्ग पाण्याखाली आले आहेत.
• कर्नाटक मधील अलमट्टी धरणातून 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू