रस्त्यावर पावसाळ्यात दीड फूट साचत होते पाणी : 75 लाखाचा निधी मंजूर
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-बाची मार्गावरील तुरमुरी गावातील कार्पोरेशन बँकेसमोरील रस्ता अत्यंत खराब झाला होता. सदर रस्त्यावर पावसाळ्यात एक ते दीड फूट पाणी साचत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक ठप्प होत होती. सदर रस्त्यासाठी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 75 लाखाचा ा†नधी मंजूर करून सदर रस्त्याचे काम तातडीने सुरू केल्याने प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील तुरमुरी या गावाजवळ असलेल्या शंभर मीटरच्या अंतरामध्ये पावसाळ्यामध्ये सातत्याने या रस्त्यावर पाणी साचत असल्याने प्रवासीवर्गाची मोठी कुचंबणा होत होती. याबरोबरच रस्त्यावर पाणी साचून व रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावर मोठमोठे ख•s पडून रस्त्याची चाळण झालेली होती. सदर रस्त्याची तातडीने दुऊस्ती करण्यात यावी, अशी मागणी तुरमुरी ग्रामस्थ, त्याचबरोबर या मार्गे ये-जा करणाऱ्या अनेक प्रवासीवर्गातूनही करण्यात आली होती. याची दखल घेऊन या रस्त्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ ग्रा. पं. अध्यक्षा वैशाली रघुनाथ खांडेकर, काँग्रेस युवानेते मृणाल हेबाळकर, एपीएमसीचे अध्यक्ष युवराज कदम, ग्रा.पं. उपाध्यक्ष चांगदेव बेळगावकर, चंद्रकांत जाधव, माऊती खांडेकर, लक्ष्मी सुतार, धनश्री कोरडे, नागनाथ जाधव, रामू खांडेकर, बाबू बेळगावकर, मलाप्पा तंगणकर, सुहास जाधव, पद्मराज पाटील, प्रकाश आंबेडकर, यलाप्पा जाधव, माऊती बेळगुंदकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असून सध्या कामाला सरुवात झाली आहे.