रामदुर्ग तालुक्मयातील बन्नूरतांडा येथील घटनेने खळबळ, 23 लाखाची रोख-120 ग्रॅम सोने लांबविले
प्रतिनिधी/ बेळगाव
रामदुर्ग तालुक्मयातील बन्नूर तांडा येथील ग्राम पंचायत अध्यक्षांच्या घरावर दरोडा घालून दरोडोखोरांनी 23 लाखाची रोख आणि 120 ग्रॅम सोने लांबविल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
ग्राम पंचायत अध्यक्ष चंद्रशेखर रजपूत यांच्या घरावर हा दरोडा घालण्यात आला आहे. पाळत ठेवून 8 दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चंद्रशेखर यांना शस्त्र दाखविले. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला बेडरूममध्ये कोंडून चोरटय़ांनी घरातील सोने आणि रोख रक्कम लांबविली. चंद्रशेखर यांचा मुलगा पीडीओ होता. त्याचे अलिकडेच निधन झाले होते. त्याच्या विम्याची रक्कम आली असता पाळत ठेवून दरोडेखोरांनी हा डाव साधल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याचबरोबर रामदुर्गचे आमदार महादेवाप्पा यादवाड यांनीही या कुटुंबाला भेट देऊन विचारपूस केली आहे. कटकोळ पोलीस स्थानकामध्ये या गुन्हय़ाची नोंद झाली असून पोलीस चोरटय़ांचा तपास करत आहेत.