न्हावेली / वार्ताहर
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानबद्दल राज्य शासनाच्यावतीने ग्रामपंचायत स्तरावर जाहिर केलेला पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ९ मे रोजी शासन निर्णय निर्गमित केले होते त्यानुसार न्हावेली गावात बचतगटाच्या माध्यमातून उकृष्ट काम केल्याबद्दल रुपाली परब व सानिया हरमलकर यानदोन महिलांचा सन्मान सरपंच अष्टविनायक धाऊसकर उपसरपंच संतोष नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .
यावेळी सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच संतोष नाईक, ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, स्नेहा पार्सेकर, आरती माळकर, ग्रामसेवक तृप्ती राणे,ग्रामस्थ दिपक नाईक, भावना धाऊसकर, गितेश परब, आत्माराम नाईक, संतोष निर्गुण, विनायक कालवणकर, आदी महिला व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .