गोपनीय माहिती चीनला विकल्याचा आरोप
► वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या आपल्या तीन शास्त्रज्ञांवर देशद्रोहाचा खटला सुरू केला आहे. या तिघांवरही क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाशी संबंधित गुप्त माहिती चीनला दिल्याचा आरोप आहे. तिघेही सायबेरियन शहरातील नोवोसिबिर्स्क येथील एका संस्थेत काम करत होते. सध्या खटल्याचा तपशील सार्वजनिक केला जाणार नाही. माध्यमांनाही यापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर शास्त्रज्ञांच्या वकिलांनीही काहीही बोलण्यास नकार दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग न्यायालयाने हा खटला टॉप सिव्रेट म्हणून घोषित केला आहे.
अनातोली, अलेक्झांडर आणि व्हॅलेरी या तिन्ही शास्त्रज्ञांवरील आरोप अत्यंत गंभीर असल्याचे रशियाच्या अध्यक्षीय कार्यालय व्रेमलिनने एक निवेदन जारी करून स्पष्ट केले आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांवर 2017 मध्ये चीनमध्ये झालेल्या एका परिषदेत क्षेपणास्त्रांसंबंधीची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप आहे. तिन्ही शास्त्रज्ञ हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तज्ञ आहेत. ते रशियाच्या पुढच्या पिढीच्या क्षेपणास्त्रांवर काम करत होते. ही क्षेपणास्त्रे आवाजाच्या वेगापेक्षा 10 पट वेगाने उडू शकतात. या तिन्ही शास्त्रज्ञांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. खटला सुरू होण्याच्या दोन महिन्यांपूर्वी रशियाच्या संसदेने एप्रिलमध्ये देशद्रोहाची शिक्षा 20 वर्षांवरून जन्मठेपेपर्यंत वाढवण्यासाठी मतदान घेतले होते.
अटकेनंतर शास्त्रज्ञाला दोनदा हृदयविकाराचा झटका
या प्रकरणातील अनातोली नामक शास्त्रज्ञाला रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नुकतेच सुनावणीसाठी आणण्यात आले. त्याच्या कोठडीत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिघांनाही गेल्यावषी जूनमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून 76 वषीय अनातोली यांना हृदयविकाराचे दोन झटके आले आहेत. त्यांची प्रकृती सतत खालावत चालली आहे.