वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स
इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला विभागात पोलंडची इगा स्वायटेक व ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आर्यना साबालेन्का यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
जागतिक अग्रमानांकित इगा स्वायटेकने माजी यूएस ओपन चॅम्पियन ब्रिटनच्या एम्मा रॅडुकानूचा 6-3, 6-1 असा पराभव करून जेतेपद स्वतःकडेच्या राखण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. तिची पुढील लढत रोमानियाच्या सोराना सिर्स्टियाशी होईल. ऑस्ट्रेलियन चॅम्पियन बेलारूसच्या साबालेन्काला बार्बरा पेसिकोव्हावर विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. तिची पुढील लढत अमेरिकेच्या कोको गॉफशी होईल. गॉफने स्वीडनच्या रेबेका पीटरसनवर 6-3, 1-6, 6-4 अशी मात करीत आगेकूच केली. गॉफने पीटरसनविरुद्ध आतापर्यंत चारपैकी तीन सामने जिंकले आहेत.