प्रतिनिधी /पणजी
गोमंतकीय मराठी लेखकांना प्रेरणा देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी गोवा मराठी अकादमीने यावर्षी विविध साहित्य पुरस्कारांची योजना जाहीर केली होती. पुरस्कारांसाठी गोमंतकीय लेखकांकडून 58 पुस्तके आली होती. पुरस्कारप्राप्त लेखक व त्यांच्या साहित्यकृतींची नावे पुढीलप्रमाणे ः
बवाळ – दयाराम पाडलोसकर (कथासंग्रह), योद्धा संन्यासी – राजू भि. नाईक (नाटक). स्टँला – विभा लाड (कादंबरी), निसर्ग संवेदना – समृद्धी केरकर (ललितलेख संग्रह), गोपाळकृष्ण भोबे ः चरित्र आणि साहित्य – परेश वा. प्रभू (चरित्र), मी सजवूनि दुःख माझे – उदय ताम्हणकर (कविता), एकटय़ाचे गाणे -परेश वा. प्रभू (संकलन-संपादन), अंतरंग म्हादईचे – शुभदा च्यारी (संकीर्ण),
रत्नागिरीच्या प्रसिद्ध मराठी लेखिका रश्मी कशेळकर आणि गोमंतकातील निवृत्त मराठी प्राध्यापिका डॉ. अरुणा गानू यांनी या पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.
पुरस्कारप्राप्त सर्व साहित्यिकांना प्रत्येकी 10,000 रु. आणि सन्मानचिन्ह देऊन सोमवार 30 मे रोजी सायं. 4 वा. इन्स्टिटय़ूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या गोवा मराठी अकादमीच्या वर्धापनदिन समारंभात प्रसिद्ध लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येईल.