बेळगाव : बलाढ्या साई स्पोर्ट्स संघाने आक्रमक फलंदाजी व भेदक गोलंदाजीच्या जोरावर अंतिम लढतीत युनिव्हर्सल स्पोर्ट्स संघाचा 7 धावांनी पराभव करून 35 प्लस प्रिमीयर लीग चषक पटकाविला. सचिन साळुंखेला सामनावीर व मालीकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. य् ाgनियन जिमखाना मैदानावर अंतिम सामन्यात साई स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडीबाद 135 धावा केल्या. त्यात सचिन साळुंखेने 1 षटकात 5 चौकारांसह 42, रोहित पोरवालने 2 षटकार 4 चौकारांसह 40 तर सुमीत जाधवने 2 चौकारांसह 17 धावा केल्या. युनिव्हर्सलतर्फे सुनिल सक्रीने 17 धावात 2, वसिम धामणेकर, सुनिल पाटील, सागर गौरगोंडा यांनी प्रत्येक 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनिव्हर्स स्पोर्ट्स संघाने 10 षटकात 8 गडीबाद 128 धावा केल्या. त्यात प्रशांत लायंदरने 3 षटकार 5 चौकारांसह 63, महेश कदमने 2 षटकार 2 चौकारांसह 44 धावा केल्या. साई स्पोट्सतर्फे सचिन साळुंखे, रोहित पोरवाल, मिलिंद चव्हाण यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. सामन्यानंतर युनियन जिमखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सभासद संजय मोरे, परशराम पाटील यांच्याहस्ते विजेत्या साई स्पोर्ट्स संघाला व उपविजेत्या युनिव्हर्सल संघाला चषक, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर सचिन साळुंखे साई स्पोर्ट्स, उत्कृष्ट फलंदाज संतोष चव्हाण, उत्कृष्ट गोलंदाज ताहिर सराफ, इम्पॅक्ट खेळाडू रोहित पोरवाल (साई) यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महांतेश देसाई, अनिल गवी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous Articleअपात्र ठरेपर्यंत काम करण्याचा अधिकार
Next Article एसकेई, एमसीसी, श्रीदुर्गा हुबळी, कर्नाटक क्लब विजयी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.