नवी दिल्ली
देशातील अव्वल आयटी कंपनी इन्फोसिसच्या संचालक मंडळाने सलिल पारेख यांची पुन्हा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) या पदांवर नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती मार्च 2027 पर्यंत करण्यात आली आहे. त्यांनी वर्ष 2018 मध्ये कंपनाची सीईओ व एमडी पदे सांभाळली आहेत. त्याच्या जवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठा अनुभव आहे.