17 जानेवारी रोजी हुतात्म्यांना अभिवादन
प्रतिनिधी/ बेळगाव
हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 17 जानेवारी रोजी कंग्राळी खुर्द येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तालुका म. ए. समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आवाहन करण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.
तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, अॅड. सुधीर चव्हाण, लक्ष्मण होनगेकर, अनिल पाटील, नारायण सांगावकर यांनी विचार व्यक्त केले. या बैठकीला जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, बी. एस. पाटील, दत्ता उघाडे, संजय पाटील, प्रेमा मोरे, माधुरी हेगडे, निरा काकतकर, कमल मन्नोळकर, कृष्णा हुंदरे, मनोज पावशे, पुंडलिक पावशे, सुनील अष्टेकर, निंगाप्पा मोरे आदी उपस्थित होते. प्रारंभी अॅड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. दत्ता उघाडे यांनी आभार मानले.