कडक्याच्या थंडीत माऊंट एव्हरेस्ट केला सर : सर्वच थरातून तिचे कौतुक
प्रतिनिधी /पर्वरी
जगातील सर्वात उंच शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा टेक सर करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. कठोर मनोबल, शारीरिक तयारी आणि सकारात्मकता यांच्या जोरावर ही कामगिरी करणे हे एक आव्हान आहे. आतापर्यंत अनेकांनी हे सर्वोच्च शिखर सर करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. पण नुकताच पर्वरीतील पीडीए कॉलनीत राहणाऱया गुंजन नार्वेकर या 12 वषीय चिमुरडीने हा 5364 मीटर उंचीचा माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प ऐन डिसेंबर महिन्याच्या कडक्मयाच्या थंडीत सर करून आपल्या नावावर विक्रम नोंदविला आहे.
सर्वात कमी वयात एव्हरेस्ट बेस कॅम्प ऐन डिसेंबरच्या थंडीत उणे अंश 10 ते 20 डिग्री तापमानाशी झुंज देत सर करण्याची कामगिरी गुंजनने केली असून त्यासाठी सर्वच थरातून तिचे कौतुक होत आहे. टेकिंगसाठी लागणारे कोणत्याही प्रकारचे अधिकृत प्रशिक्षण घेतलेले नसताना तिने ही कामगिरी करून दाखविली आहे हे विशेष. यापूर्वी तिने केदारनाथ शिखर, तुंगनाथ शिखरावरही चढाई केली होती.
5364 मीटर उंचीवर असणारी प्राणवायूची नीचांक पातळी, या वातावरणामुळे सतत होणारी मळमळ आशातही तिने स्वतःला कणखर ठेवत आपले ध्येय गाठले आहे. गुंजन येथील श्रीनिकेतन विद्यालयात इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करताना तिच्याबरोबर तिचे वडील पंकज नार्वेकर होते. तिला हे शिखर सर करताना अनेक अडचणी आल्या. मात्र त्या परिस्थितीतही ती खचली नाही तर अतिशय जिद्दीने तिने आपले ध्येय पूर्ण केले. गुंजनने हा बेस कॅम्प सर करत आपल्यातील जिद्द दाखवून दिली आहे. तिने हा बेस कॅम्पपर्यंतचा ट्रेक 31 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1.30 वाजता पूर्ण केला. तिने हा प्रवास दि. 23 डिसेंबर रोजी सुरू केला होता. तिने हा बेस कॅम्प आठ दिवसांत पूर्ण केला आहे. अन्य लोक हा बेस कॅम्प एप्रिल-मे महिन्यात करतात. काहीही झाले तरी ते उंच टोक गाठायचे म्हणजे गाठायचेच अशी जिद्द उराशी बाळगत तिने ती उंची गाठण्याचे यश संपादन केले आहे.