Samarjeet Singh Ghatge News : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. कोण मुख्यमंत्री झाला तर मला फरक पडत नाही. अडीच वर्षे सत्ता नसताना तुम्ही माझ्या सोबत राहिलात.कामं होतं नव्हती म्हणून मला राग यायचा. पण यावेळी त्या घटनेने हताश आणि नाराज झालो.कार्यकर्त्यांचे इतके फोन येत होते की मी फोन बंद ठेवला.त्याबद्दल मी माफी मागतो. मी साताऱ्यातून पुन्हा मुंबईला गेलो. मला चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केला असल्याची माहिती समरजीतसिंह घाटगे यांनी दिली. आज ते मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी लावलेली उपस्थिती हा महापूर आहे. त्यांचे मी व माझ्या कुटुंबातील व्यक्तीकडून आभार मानतो. माझ्या कार्यकर्त्यांनी मोठी रिस्क घेऊन व्यासपीठावर हजेरी लावली.मी माझं पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना भेटायला अजिबात गेलो नाही.मला त्यांच्याशी थेट बोलायचं होतं. दीड तास मी त्यांच्याशी चर्चा केली,मी त्यांच्याशी बिन्दास्त चर्चा केली. त्यांनी जो मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी ऋणी आहे.
राज्यातील सर्व पक्षाचे मला फोन आले.हे फोन मला कोणी करायला सांगितले हे माहिती आहे.मला घालवायची एव्हडी घाई का? असा सवाल यावेऴी त्यांनी उपस्थित केला. माझा निर्णय आज जाहीर करतो असं म्हणत भाजपचा स्कार्फ गळ्यात घातला.भाजप बुद्रुकसाठी आम्ही पार्टी का सोडायची?असा टोला नाव न घेता मुश्रीफांना लागवला.पक्षनिष्ठा काय असतें? हे आज कागल मधून मी दाखवतो.माझे राजकीय गुरु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आहेत.माझी हेळसांड,कूचंबना आणि अडचन झाली म्हणून गुरु बदलण्याची मला सवय नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी गुरुची साथ सोडणार नाही, असेही घाटगे म्हणाले.
अजित दादा पवार यांनी आम्हाला पुरोगामीचा दाखला दिला आहे.आता त्यांचे कार्यकर्ते आमच्या प्रचारात उतरतील,याहून वेगळा आनंद काय असेल.अखंड महाराष्ट्राला माहिती आहे की कागलमध्ये परिवर्तन होतंय. म्हणून महाराष्ट्राचे लक्ष कागलवर आहे. आज आपल्या विजयाची भूमीपूजन झाले आहे.कागलमध्ये स्वराज्याचा भगवा आला.जे काही झालं ते एकदम करेक्ट झालं.आपण किती मताधिक्याने जिंकायचं याची तयारी करा, अस आवाहन समरजीतसिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांना केलं. मी आज माझ्या विजयाची पायाभरणी केली आहे. 2024 ला कागलचा कोडांणा परत घ्यायचा.समरजित घाटगे हा तुमची साथ सोडणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.