हैदराबाद -तेलंगणा येथे येत्या 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या 5 व्या राष्ट्रीय कॅडेट क्योरूगी तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी गोव्याच्या मुला -मुलींच्या संघाची निवड करण्यात आली असून त्यामध्ये समृद्धी पाटील हिचा समावेश आहे.
पाचव्या राष्ट्रीय कॅडेट क्योरूगी तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या गोव्याच्या मुलांच्या संघात नऊ तायक्वांदोपटूंचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे मुलींच्या संघात कनिष्का देवशेकर, मेघन फुर्तादो, समृद्धी पाटील, हाफिजा सय्यद शेख, इराम कॅरोल, अमिना करनाची आणि स्नेहा यादव यांचा समावेश आहे. गोव्यातील फातोर्डा नेहरू स्टेडियमच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमांमध्ये गोवा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ प्रशिक्षक थिओफिल लोव यांनी गोव्याच्या संघाची घोषणा केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे कुडतरीचे आमदार ॲलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी या सर्व तायक्वांदोपटूंचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्याद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या. गोवा राज्याच्या संघात निवड झाल्याबद्दल तिचे आप्तस्वकीयांमध्ये तसेच सर्वत्र अभिनंदन होत आहे.