वृत्तसंस्था/ मुंबई
दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग यांनी आपला परवडणारा स्मार्टफोन गॅलेक्सी ए 05 एस भारतीय बाजारामध्ये लॉन्च केला आहे. कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरनेयुक्त हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज त्याचप्रमाणे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या पर्यायासह बाजारात आला आहे. 4 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत सुमारे 15 हजार रुपये इतकी असणार असून सदरचा स्मार्टफोन हा गॅलेक्सी ऑनलाईन स्टोअर, ई-कॉमर्स वेबसाईटवर त्याचप्रमाणे सॅमसंगच्या स्टोअर्सवर खरेदी करता येणार आहे. याचसोबत गॅलेक्सी झेड फ्लिप 5 हा पिवळ्या रंगांमध्ये अलीकडेच कंपनीने लॉन्च केला आहे. सदरचा स्मार्टफोन 26 जुलैला क्रीम, ग्राफाईट, मिंट आणि लव्हेंडर या रंगांमध्ये लाँच केला होता.
काय आहेत वैशिष्ठ्यो….
नव्या गॅलेक्सी ए 05 एस या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा पीएलएस एलसीडी डिस्प्ले दिला गेला आहे. उत्तम कार्य प्रणालीसाठी कंपनीने या स्मार्टफोनमध्ये कॉलकाम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. अँड्रॉइड 13 वर हा प्रोसेसर काम करतो. फोटोग्राफीसाठी कंपनीने 50 मेगापिक्सल कॅमेरा फोनमध्ये दिला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. 25 वॉटचा चार्जर आणि 5000 एमएएचची दमदार बॅटरी तिही लिथियम पॉलिमरसह दिली आहे.