भारतातच टीव्हींचे करणार उत्पादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक ग्राहकोपयोगी उत्पादने तयार करणाऱ्या सॅमसंगने टीव्ही क्षेत्रामध्ये आता ओएलईडी प्रकारातील टीव्ही भारतीय बाजारामध्ये सादर करण्याचा विचार चालवला आहे. एवढेच नव्हेतर सदरच्या टीव्हींची निर्मिती भारतामध्येच करण्याचा विचारही कंपनीने केल्याचे म्हटले जात आहे.
प्रिमियम टीव्ही प्रकारामध्ये सॅमसंग इंडियाचा वाटा भारतामध्ये अधिक राहिला आहे. या अनुषंगाने ओएलईडी (ऑरगॅनिक लाईट इमिटिंग डीओड) प्रकारातील टीव्हींचे उत्पादन भारतात कंपनी करणार आहे. ओएलईडी प्रकारात एस 95 सी आणि एस 90 सी हे टीव्ही 4 के प्रोसेसरसह सादर करण्याची योजना कंपनीची आहे. ओएलईडीच्या प्रकारामध्ये नव्या आधुनिक टीव्हींची निर्मिती करण्यावर कंपनीचा भर असणार आहे. या टीव्हींमध्ये चित्र पाहण्याचा वेगळा आनंद ग्राहकांना अनुभवता येणार असल्याचे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाचे उपाध्यक्ष मोहनदीप सिंग यांनी म्हटले आहे.
सॅमसंग कंपनीचे ओएलईडी प्रकारामध्ये जास्तीतजास्त वाटा उचलण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असणार आहेत. ओएलईडी प्रकारातील सॅमसंगच्या टीव्हीची किमत 1 लाख 69 हजार रुपयांपासून सुरु होते.