सावंतवाडी : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आकेरीचे माजी सरपंच श्री संदिप अमृत राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कडून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलंय . आकेरीचे माजी सरपंच, आकेरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी उपाध्यक्ष,शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे संचालक संदिप अमृत राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती मा. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान केले. संदिप राणे हे माजी मंत्री प्रवीण भोसले यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांचे संघटन कौशल्य चांगले असून त्यामुळेच त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर आर.के सावंत, मनोहर साटम, सावळाराम अणावकर, प्रज्ञा परब,पूजा पेडणेकर ,सर्वेश पावसकर इत्यादी उपस्थित होते.