म्हैसाळ वार्ताहर
शुक्रवारी सायंकाळी ५चे सुमारास मेघगर्जनेसह तब्बल दीड तास मुसळधार पावसाने झोडपून काढले.यामुळे सगळा परीसर जलमय झाला होता.
दिवसभर उन्हाचा ताव होता यामुळे सायंकाळी मेघांनी अंधारून आले आणि दीड तास मुसळधार पावसाने झोडपून काढले.यामुळे परीसरातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत.अखंड पावसाळ्यात शुक्रवारी चा सर्वाधिक पाऊस पडला यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान पुरेशा पावसाअभावी पूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून आता किमान रब्बी हंगाम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यापावसाने जमीनीत पुरेशी ओल निर्माण झालेने आतामशागतीची कामाला वेग येईल यामुळे गहू,हरभरा,शाळू,मका यासारखी पिके घेता येईल या आशेने शेतकरी आता तयारीला लागतील असे वाटते.सदरचा पाऊस म्हैसाळ, विजयनगर, नरवाड,वड्डी, ढवळी परीसरात चांगला झाला आहे यामुळे समाधान व्यक्त होत आहे.