बंद कारखाना सुरू करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न-तानाजीराव पाटील
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याचा रोलर पुजन सोहळा कारखान्याचे उपाध्यक्ष ब्रम्हदेव होनमाने यांच्याहस्ते पार पडला. माणगंगा साखर कारखाना बंद स्थितीतुन पुन्हा चालु स्थितीत आणण्याचे मोठे आव्हान असुन ते शेतकरी हितासाठी स्विकारले आहे. सर्व संकटावर मात करून कारखाना सुरू होईल, असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी व्यक्त केली.
शिवसेना नेते तानाजीराव पाटील, कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष ब्रम्हदेव होनमाने, हणमंतराव पाटील, साहेबराव पाटील, दत्तात्रय पाटील, शहाजीबापु जाधव, बंडु कातुरे, जगन्नाथ लोखंडे, प्रा.साहेबराव चवरे, किसन गायकवाड, सभापती संतोष पुजारी, टी.डी.चव्हाण, बाळासाहेब होनराव, मुन्नाभाई तांबोळी, संपतराव पाटील, विजय देवकर, मच्छिंद्र पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगंगा साखर कारखान्यावर पुजा करून रोलर पुजन करण्यात आले.
आटपाडी तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. गत 5 वर्षापासुन माणगंगा कारखाना बंद आहे. शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच माणगंगा कारखान्यात स्थापनेपासुन प्रथमच बिनविरोध सत्तांतर झाले. हा कारखाना सुरू करण्यासाठी आटपाडी, सांगोला व माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साकडे घातल्याने आम्ही निवडणुक प्रक्रियेत उतरलो. कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, ही आमची भुमिका असुन त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
जिल्हा बँक व माणगंगा कारखान्यामध्ये करार करून हा कारखाना माणगंगा साखर कारखाना या संस्थेने चालविण्यास घेतला आहे. हा कारखाना चालु करण्यासाठी गत दोन महिने अहोरात्र कष्ट सुरू असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी सांगितले. राजकारण नव्हे तर शेतकरी हितासाठी आम्ही माणगंगेची ठप्प यंत्रणा कार्यान्वित करत आहोत.
आम्ही कारखाना सुरू करू शकतो, हा शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने आम्ही त्याला तडा जाणार नाही, यासाठी कष्ट घेत असल्याचेही तानाजीराव पाटील म्हणाले. नैसर्गिक, कृत्रिम व तांत्रिक अडथळ्यांना बाजुला करत दोन महिने रात्रीचा दिवस करून काम सुरू आहे. कारखान्याचे काम प्रगतीपथावर येत असून 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे मार्गी लावुन यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याला आमचे प्राधान्य असल्याचे तानाजीराव पाटील यांच्यासह कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी स्पष्ट केले.
संचालक तातोबा पाटील, विलास बारवकर, प्र.कार्यकारी संचालक नामदेव मोटे, बाळासाहेब जगदाळे, रावसाहेब सागर, एम.जी.चव्हाण, सुनिल सरक, बी.एन.बंडगर, बाबुराव जाधव, भगवान पाटील, सुनिल तळे, जालिंदर नवले, सुहास देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांमध्ये उत्साह आणि विश्वास
माणगंगा साखर कारखाना तालुक्याची अर्थवाहिनी आहे. मागील काही वर्षे कारखाना बंद होता. तो सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्यावर सभासदांनी विश्वास टाकला आहे. त्यांनीही अविरत कष्ट घेत कारखाना सुरू करण्यासाठी योगदान दिले आहे. रोलर पुजनच्या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये उत्साह असुन तानाजीराव पाटील, कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील हे अशक्य ते शक्य करतील. बंद यंत्रणा गतीमान तालुक्याच्या विकासाला गती येईल.
—किसन गायकवाड– संचालक