गणेश विसर्जनाचा मार्ग मोकळा; कृष्णा नदीत कोयनेतून सोडलेले पाणी दाखल
सांगली :
गणेश विसर्जनाचं सावट निर्माण झाल्यानंतर जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन पाठपुरावा केल्यावर अखेर कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी सांगली दाखल झाले आहे. त्यामुळे कृष्णा नदी पुन्हा एकदा भरभरून वाहत आहे. कृष्णा नदीत पाणी आल्याने आता गणेश भक्तांनी सातव्या दिवशीच्या विसर्जनासाठी नदीपत्रावर गर्दी केली आहे.
घरगुती गणपती सह अनेक मंडळाच्या गणपतीचे विसर्जन आज केलं जातं मात्र कृष्णा नदीची पाणीपातळी चिंताजनक होती. त्यामुळे विसर्जन कुठे करायचा असा प्रश्न गणेश मंडळ तसेच सार्वजनिक मंडळांना पडला होता. मात्र पालकमंत्री सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी आणि महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी कोयना प्रशासनाची पाठपुरावा करून पाणी सोडण्याबाबत नियोजन केलं.
कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी आज सांगलीच्या कृष्णा नदीत दाखल झाल्यानंतर गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं. त्यामुळे सातव्या दिवशीच्या विसर्जनासाठी गणेश भक्तांनी सांगलीच्या कृष्णा नदीच्या सर्व घाटावर गर्दी केली आहे.